यावल, प्रतिनिधी | यावल काँग्रेस कमेटीच्या वतीने देशाचे पहीले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिनाचे औचित्य साधून गरीब मुलांना बिस्किटं व फळ वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला प्रदेशअध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार पंडित नेहरू यांची जयंती व बालदिनानिमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यासाठी आमदार तथा महा प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष शिरीष दादा चौधरी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, जळगाव यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती व बालदिनानिमित्त अनु. जाती विभागाच्या जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाअध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे यांच्याहस्ते माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चिखली खुर्द गावातील आदिवासींच्या वस्तीवर गोर गरीब मुलांना बिस्कीट, फळे वाटप करून बाल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अभिषेक इंगळे व ग्रामस्थ मंडळी महिला, युवा कार्यकर्वे आदी उपस्थित होते.