यावल, प्रतिनिधी | त्रिपुरा राज्यात मुस्लिम बांधव व त्यांच्या धार्मिक स्थळांवर लक्ष करून दंगली घडवून आणले जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांकडून यावल येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, मागील आठवड्यात बांगलादेशात घडलेल्या घटनेचे पडसाद त्रिपुरा राज्यात मोठ्या प्रमाणात उमटले जात आहे. अल्पसंख्यांक बांधव व धार्मिक स्थळांना लक्ष केले जात असुन दंगली भडकवल्या जात आहे. या घटनेची जाहीर निषेध करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून आज यावल येथे कडकडीत बंद पाळण्यात आले. छोटे-मोठे व्यवसायिक व व्यापारी यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. तत्पूर्वी मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याने मुस्लीम बांधव हे शहरात आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान शहरातील सुदर्शन चौक, नगीना चौक, खिर्निपुरा डांगपुरा व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान अल्पसंख्याकावर केलेल्या क्रुरता व धार्मीक स्थळांना आग लावणाऱ्या दोर्षीवर गुन्हा दाखल करून इस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर (स ) यांना अपशब्द बोलणाप्यावर त्वरीत गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान इमाम अहमद रज़ा एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटी व शहरातील नागरीक यांनी काल गुरुवारी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्याचबरोबर एका दहशतवादी संघटनेने इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांना भाषेतुन अपशब्द बोलुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. व त्रिपुरा राज्यात धार्मीक स्थळ मशीदी व पवित्र धर्मग्रंथ, कुराण दहशतवादी संघटनांकडुन जाळण्यात आले आहे. त्रिपुरा राज्यतील निष्पाप मुस्लिम नागरीकांना जीवे ठार मारण्यात आले आहे. त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करून घरांची जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे दहशतवादी संघटनांवर बंदी घालुन त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करून फोजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे हि विनंती मुस्लिम बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी हाजी असलम खान सुब्हान खान , हाजी नसिरुद्दीन शेख , मोहसीन खान गफुर खान , शेख अलताफ अब्दुल समद , हाजी शेख कलीम मो याकुब रियाजोद्दीन मोयोदीन , ईसरार खान हबीब खान अमर अली कच्छी, राशीद खान वाजीद खान जाकीर कुरेशी आदी उपस्थित होते.