जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात घरगुती गॅसचा वापर गैर पध्दतीने वापर करत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांनी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाने शहरातील शाहू नगर आणि शनीपेठ परिसरात छापा टाकून एकुण ११ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकुण ११ लाख ५६ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ, शनीपेठ आणि शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जळगाव शहरातील शाहू नगरातील शाहू नगर कॉम्लेक्स, ट्राफीक गार्डन परिसर आणि शनीपेठ परिसरात अवैधपणे घरगुती सिलिंडरमधून गॅस वाहनांमध्ये भरून दिल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक आणि जिल्हा पोलीसांनी शाहू नगर ट्राफिक गार्डन येथे शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता धडक कारवाई केली. यात घरगुती गॅसची काळ्या बाजारात चोरटी विक्री करत असतांना आढळून आले. यात जाकीर शेख चाँद पिंजारी (वय-४५) रा. काट्या फाईल, शनीपेठ हा रिक्षा चालक राजेश अर्जून गोपाळ (वय-३८) रा. समता नगर जळगाव यांच्या रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ३०१५) घरगुती गॅस भरतांना आढळून आले. दोघांवर कारवाई करत दोन गॅसचे सिलेंडर, रिक्षा व गॅस भरण्याचे साहित्य असा एकुण १ लाख ७८ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल हस्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात जाकीर शेख चांद पिंजारी व रिक्षा चालक राजेश अर्जून गोपाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत शाहू नगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्समध्ये मच्छी बाजारासमोरील वॉलकंपाऊंडच्या भिंतीजवळील एका टपरीत मकसूद अली न्यायज अली सैय्यद (वय-६६) रा. भिस्तीवाडा शाहू नगर हा देखील घरगुती गॅसचा वापर वाहनांसाठी करत असल्याचे आढळून आले. याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत २० हजार ३०० रूपये किंमतीचे भारत गॅसचे ८ सिलेंडर, ६ हजार किंमतीचे डिजीटल काटा आणि १६ हजार रूपये किंमतीचे गॅस भरण्याचे मशिनी असा एकुण ४३ हजार ३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक किरण चौधरी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात मकसूद अली न्यायज अली सैय्यद याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तिसऱ्या कारवाईत शहरातील काट्याफाईल येथे देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यात शेख नदीम शेख रसुल (वय-४०) रा. काट्या फाईल फैज मेडीकलजवळ हा घरगुती गॅस वाहनांमध्ये भरत असतांना आढळून आल्याने कारवाई करत गॅस भरण्याचे साहित्यासह ८३ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जमा केला आहे. दुसरा छापा कांचन नगरातील वाल्मिक नगरात टाकून केलेल्या करवाईत कैलास विलास सोनवणे (वय-४५) रा. वाल्मिक नगर आणि सुरज नारायण सोनवणे (वय-३०) रा. गेंदालाल मिल यांच्यावर करवाई करत त्यांच्याकडून गॅस भरण्याचे साहित्यासह २ लाख १० हजार ४० मुद्देमाल जमा केला तर तिसऱ्या कारवाई ही लेंडी नाल्याजवळ टाकून शुभम राजू बोरसे (वय-२५) रा. वाल्मिक नगर, संदीप अरूण चौधरी (वय-२९) रा.पिंप्राळा गणपती नगर, अशिफ अब्दुल रहेमान (वय-४६) रा. फातीमा नगर, किरण शालीक कोळी (वय-२५) रा. समता नगर आणि मोहमंद सलमान गुलाम शाबीद बागवान रा. जोशी पेठ जळगाव या पाच जणांवर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील गॅस भरण्याचे साहित्या, डिजीटल काटा आणि गॅसचे सिलेंडर असा एकुण ६ लाख ४१ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या तीनही कारवाईत शनीपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय पवार, पोहेकॉ विकास वाघ, साहेबराव चौधरी, पो.ना. किरण चौधरी, पोहेकॉ कमलाकर बागुल, सुनिल दामोदरे, अनिल देशमुख, पो.ना. किशोर राठोड यांनी केली आहे.