जळगाव, प्रतिनिधी | शहरातील ऑटोरिक्षा विना मीटरच्या धावत आहेत. याबाबत स्थानिक स्तरावर अंमलबजावणी होत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी थेट याची तक्रार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्य प्रधान सचिव, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त यांना केली आहे.
शहरातील ऑटोरिक्षा विना मीटरच्या धावत आहेत. या रिक्षांना मीटर लावण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता केली होती. यानंतर रिक्षाचालकांना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मीटरप्रमाणे भाडे आकारणे (घेणे) बंधनकारक करत दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश काढले आहेत. परंतु ,हा आदेश देवून जवळपास १० दिवस उलटली असतांना शहरात मीटरप्रमाणे भाडे आकारणी सुरु झालेली नसल्याचे सर्वसामन्य प्रवशांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे श्री. गुप्ता यांनी तक्रार केली आहे. यात शहरातील ऑटोरिक्षा विना मीटर धावत असल्याने या ऑटोरिक्षांचालक नियमांचे उलंघन करत आहेत. अशा ऑटोरिक्षा चालकांना नियमानुसार मीटर रीडिंगप्रमाणे भाडे घेणे सक्तीचे करावे अशी मागणी केली आहे.