Home क्राईम डंपरने दुचाकीला उडविले : एक ठार, दोन गंभीर जखमी

डंपरने दुचाकीला उडविले : एक ठार, दोन गंभीर जखमी

0
112

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथे रात्री डंपरच्या धडकेत दुचाकीवरील एका तरूणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, नशिराबादच्या सिद्धार्थनगरात रहणारे विशाल उर्फ विकी रमेश रंधे (वय २५), रोहित दगडू इंगळे (वय २५), उदय भगवान बोदडे (वय २३) असे तिघे एमएच-१९, डीएस-८६९२ क्रमांकाच्या दुचाकीवरून रात्री साडेबाराच्या सुमारास घरी येत होते. दरम्यान, महामार्गावरील उड्डाण पुलाखालून सुनसगावकडे जाणार्‍या एमएच-१९ झेड, ४७४८ या क्रमांकाच्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात विशाल उर्फ विकी रमेश रंधे याचा जागीच मृत्यू झाला. तर रोहित इंगळे आणि उदय बोदडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील रोहित इंगळे याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


Protected Content

Play sound