Home Cities जळगाव शास्त्री टॉवर चौकात भाजपातर्फे नवाब मलिक यांच्या निषेधार्थ पुतळ्याचे दहन (व्हिडीओ)

शास्त्री टॉवर चौकात भाजपातर्फे नवाब मलिक यांच्या निषेधार्थ पुतळ्याचे दहन (व्हिडीओ)

0
39

जळगाव प्रतिनिधी । महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांवर बेछुट आरोप करत आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील शास्त्री टॉवर चौकात नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाने मारत दहन करण्यात आले.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक हे फक्त मिडिया समोर राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्यावर बिनबुडाचे खोटे आरोप करीत असून स्वतः नगरमध्ये यांचे जावई हे ड्रग्ज प्रकरणांमध्ये अडकले आहे.  त्यामुळे मंत्री नवाब मलिक यांना मंत्रीमंडळातून हाकलपट्टी करावी अशी मागणी करून मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रदेश महिला उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराचे सरचिटणीस नितीन इंगळे, महानगर उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, महानगर चिटणीस राहुल वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, जळगाव तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे, नगरसेवक विरेन खडके, व्यापारी आघाडीचे अशोक राठी, दिव्यांग आघाडीचे  गणेश वाणी, कामगार आघाडीचे कुमार सिरामे, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, उपाध्यक्ष गणेश महाजन, स्वामी पोतदार, विकी सोनार, राहुल मिस्त्री, जयेश ठाकुर, चिटणीस सागर जाधव, अश्विन सैंदाणे, गौरव पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4552093368203721

 

 


Protected Content

Play sound