पाचोऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी!

पाचोरा, प्रतिनिधी| दिवाळी व भाऊबीज निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरीकांचे बंद घरांचे कुलूप तोडून घरातील सोने, चांदी व रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा शहरांसह तालुक्यातील नागरिक हे दिवाळी व भाऊबीज निमित्ताने शनिवार रोजी बाहेरगावी गेले. दरम्यान घराला कुलूप लावून ते बाहेर गावी गेलेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी विविध पाच ठिकाणी घरफोडी केली. घरातील सोने, चांदी व रोकड असे लाखांचे ऐवज लंपास अज्ञात इसमाने लंपास केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी शहरातील अरिहंत नगरमधील फळ विक्रेता संजीव सुक्राम चौधरी हे शनिवार रोजी चोपडा येथे त्यांच्या बहिणीकडे भाऊबीजनिमित्त गेलेले होते. मात्र ते घरी परतताच त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडून घरातील कपाटातून सोने चांदिच्या दागीन्यासह सुमारे दिड लाख रुपयांचे ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

 

तसेच वरठाण ता. सोयगाव येथील रहिवासी असलेले व रावेर तालुक्यात प्राथमिक शिक्षक असलेले किशोर तुळशिराम चौधरी हे शनिवारी वरठाण येथे कुटुंबीयासह गेलेले असतांना त्यांच्याही घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तशाच पद्धतीने तोडून कपाटातील सोने चांदीच्या दागिन्यासह सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे ऐवज चोरीला गेले. शहरातील श्री. गो. से. हायस्कूल जवळ राहत असलेल्या व कोपरगाव येथे ठिबक सिंचन कंपनीत नोकरीस असलेल्या धनंजय राजाराम नेवे हे भाऊबीज निमित्त बऱ्हाणपूर येथे मुक्कामी गेलेले असतांना त्यांच्याही घराचा दरवाजाचा कडी कोंडा कटरने कापून घरात प्रवेशकडून कपाटातील ७४ हजार रुपये रोख, साडे आठ ग्राम सोने व सात ग्राम चांदी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त शहरात दोन ठिकाणी वरील प्रमाणेच कटरने कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोने चांदी चोरून नेले आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास हवा. भगवान बडगुजर हे करीत आहेत.

Protected Content