Home धर्म-समाज व्यवसायावरील निर्बंध उठविण्याची कुंभार समाज महासंघाची मागणी (व्हिडिओ )

व्यवसायावरील निर्बंध उठविण्याची कुंभार समाज महासंघाची मागणी (व्हिडिओ )

0
56

WhatsApp Image 2019 04 18 at 7.42.23 PM

भुसावळ (प्रतिनिधी) भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यावर हरकती मागविल्या आहते. यानुसार महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाची नुकतीच बैठक होऊन या अधिसूचनेतील तरतुदींवर आक्षेप घेण्यात आले आहेत. या अधिसूचनेत संशोधन करण्याची मागणी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे सुभाष महादू पंडित (कुंभार) यांनी सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तनच्या सचिवांना लिहिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

 

बैठकीत  प्रामुख्याने या अधिसूचनेमुळे कुंभार समाजाच्या पारंपारिक व्यवसायावर गदा आली असल्याची मत मांडण्यात आले. कुंभार समजा हा गरीब असून वीट भट्टीचा त्यांचा पारंपारिक व्यवसाय असून या व्यवसायास काही सोयी सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे वीट भट्टीधारकांना फ्लाय अॅशचा वापर करण्याची सवलत देण्यात यावी. तसेच औष्णिक विद्युत प्रकल्प येथून एक रुपया प्रती टन दराने फ्लाय अॅश उपलब्ध करावे. यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत, कुंभार समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात ९० लाख  असून यातील ६० लाख लोक हा व्यवसाय करतात तसेच या व्यवसायाशी निगडीत इतर समाजातील ३० लाख लोक हे बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. वीट भट्टीवाले तलाव, नाले, नदी येथून वीट बनविण्यासाठी माती घेत असतात. यामुळे त्यांची जलसंधारणाची क्षमता वाढीस लागण्यास मदत होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound