यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव बुद्रूक येथे यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले वाचनालय व ग्रंथालयाचे नुकतेच उद्घघाटन करण्यात आले.
महात्मा ज्योतीबा फुले वाचनालयाचे उद्घाटक पोलीस निरिक्षक सुधीर पाटील व सावदा पोलीस स्टेशनचे पोलीसउप निरीक्षक देविदास इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले. हिंदवी स्वराज्य सेना किनगाव यांनी हे वाचनालय सुरू केले असून गावातील श्रीराम चौक, चौधरीवाडा जवळ हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष राहुल कडू पाटील, अनिस राजु पिंजारी, (उपाध्यक्ष , )मोहन रमेश पाटील (सचिव), समाधान प्रकाश महाजन (सह सचिव ), दिपक भिकन सावांदे, खजिनदार रहिम सलिम तडवी, मार्गदर्शक गोपाळ गंभीर धनगर, ग्रंथपाल सद्दाम सलिम खाटीक, रक्षक रोशन विनायक साळुंके, सदस्य गौरव प्रकाश कोळी,सदस्य कामेश सतिष सोनार, सदस्य मुकेश श्रावण पाटील, सदस्य सागर लहु पाटील, सदस्य रविंद्र प्रल्हाद जाधव, सदस्य पंकज सुधाकर धनगर, सदस्य उदय विकास चौधरी, सदस्य उपास्थित होते. यावेळी श्रीराम मंदिर संस्थानचे चेअरमन करमचंद पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कडू आप्पा, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विजय पाटील, बाँक्सरपटू दिशा पाटील, संदीप पाटील, गोपाळ पाटील, दुर्गादास चौधरी, इमरान तडवी, राजु पिंजारी, चुडामण चौधरी, युवराज चौधरी, भुषण महाजन, शरद पाटील, योगेश धनगर, प्रल्हाद जाधव आदींसह भरती प्रशीक्षणार्थी व ग्रामस्थ उपस्थीत होते. प्रस्ताविक सेवानिवृत्त शिक्षक डी.एस.खैरनार सर (देवगाव)यांनी केले.