
जळगाव प्रतिनिधी । रेल्वेच्या धक्क्याने कासवा येथील एका 56 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून याबाबत यावल पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कासवा येथील बाळू त्र्यंबक काळे (वय-56) हे कामानिमित्त बाहेर गेले होते. सकाळी दुसखेडा रेल्वेस्टेशनजवळ रेल्वेच्या धक्का लागल्याने त्यांचा उचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परीवार आहे. याबाबत यावल पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईंकाच्या ताब्यात देण्यात आले.


