पुणे: महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड प्रवर्गातील पदांसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत घोळ झाल्याच्या तक्रारीबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून याचा तपास आता सायबर सेलकडे सोपविण्यात आला आहे.
आरोग्या खात्यातील विविध पदांसाठी २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा पार पडली. आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया राबवण्याचं काम न्यासा या कंपनीला देण्यात आलं होतं. आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. या अनुषंगाने एमपीएससी समन्वय समिती पुणे यांच्याकडून सायबर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या भरतीमधील गोंधळाची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. एमपीएससी समन्वय समितीनं पुणे सायबर विभागात तक्रार देण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून फुटलेल्या व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेची तपासणी करायला सुरुवात कऱण्यात आली आहे.
आरोग्य खात्याचा पेपर फुटून व्हॉट्सऍपवर प्रश्नपत्रिका व्हायरल कशी झाली ? याचा सायबरकडून तपास करण्यात येत आहे. चौकशी करून भरतीतील गोंळासंदर्भात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे.