खामगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील लसिकरन एकूण ४५ % नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. त्यामुळे ही टक्केवारी वाढविन्याकरिता तालुक्यातील नागरिकांनी स्वयमफूर्तिने पुढाकार घेवून लस घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले. ते तहसील कार्यालय येथील महात्मा गांधी सभागृहामध्ये कोविड लसीकरण जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
राजेंद्र जाधव पुढे म्हणाले की, आतापर्यंत खामगाव तालुक्यातील एकूण १ लाख ३० हजार लोकांनी कोरोणा प्रतिबंध लस पहिला डोस घेतला आहे. तसेच याअगोदर सुद्धा लसीकरणासाठी एमआईडीसी परीसरामध्ये कॅम्प, कॉलेजमध्ये कॅम्प, नव दुर्गा उत्सव प्रसंगी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. सद्यस्थितीत खामगाव नगर परिषद हद्दीमध्ये सामान्य रुग्णालय खामगाव, नगर परिषद शाळा नं २ व ९ येथे लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच मोबाईल लसीकरण व्हॅन सुद्धा फिरवण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालय लाखनवाडा व ५ ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच त्या अंतर्गत येणारे गावांमध्ये सुद्धा लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. खामगाव तालुक्यातील ज्यांनी कोवीड लस सध्या घेतली नाही अशा सर्व नागरिकांनी या लसीकरणाच्या ठिकाणी जाऊन लसीकरणाचे डोस घ्यावे व कोरोनापासून आपले तसेच आपल्या परिवाराचे जीवन सुरक्षित करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाचे धर्मगुरु, मौलवी, काज़ी, उर्दू शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, कर्मचारी, डॉक्टर, आदि नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते. मौलाना, धर्मगुरू, तसेच डॉक्टर यांनी लसीकरणाबाबत लोकांच्या मनामध्ये असणारे गैरसमज दूर करून लोकांना लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. याप्रसंगी तहसीलदार अतुल पाटोळे, नायब तहसीलदार पाटिल, मुख्याधिकारी मनोहर आकोटकर, आदी उपस्थित होते.