जळगाव प्रतिनिधी । शहरातील संत गाडगेबाबा निराधार निवारा व दिव्यांग बांधवांना निवारा केंद्रात दिवाळी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे मिळाई वाटप करण्यात आले.
दिवाळीनिमित्त आनंदाचे वातावरण असतांना गोरगरीब , निराधार वृद्ध देखील या आनंदापासुन वंचित राहता कामा नये या उद्देशाने जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संत गाडगेबाबा निवारा केंद्र येथील सर्व वृद्ध आजी, आजोबांचे व शहरातील दिव्याग बांधवांचे मिठाई देऊन तोंड गोड करण्यात आले.
आरोग्यविषयक किंवा इतर कुठलीही समस्या असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव निराधार वृद्धांच्या व दिव्याग बांथवाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल, असे जिल्हाअध्यक्ष रविंद्र पाटील यांनी आश्वस्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपुलकीने केलेली विचारपूस व दिलेली भेट यामुळे वृद्ध भारावले होते. त्यांनी याविषयी समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, वाल्मिक पाटिल, मझर पठाण, वाय.एस. महाजन, सुदाम पाटील, अमोल कोल्हे, सुशील शिंदे, विशाल देशमुख, अकील पटेल, अनिल पवार, नईम खाटीक, जितेंद्र बागरे, योगेश लाडवंजारी, गणेश पाटील, गणेश पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.