Home धर्म-समाज यावल येथे लोहपुरूष पटेल यांची जयंती व इंदीरा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

यावल येथे लोहपुरूष पटेल यांची जयंती व इंदीरा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन


यावल प्रतिनिधी । लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने यावल येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात काँग्रेस पक्षातर्फे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जि.प.चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला भगतसिंग पाटील, पंचायत समितीचे गटनेते तथा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शेखर पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे, विलास अडकमोल, आर आर तडवी, पुंडलिक बारी, नगरसेवक रसूल मेंबर, नगरसेवक मनोहर सोनवणे, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, सद्दाम शाह खलील शाह, नगरसेवक शेख अस्लम शेख नबी, संकलेन शेख, विक्की गजरे, इम्रान पहेलवान, कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, सूर्यकांत गाजरे, अयाज खान, राजू करांडे, चेतन करांडे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound