Home क्राईम झुरखेडा येथे भरदिवसा बंद घरातून ४९ हजाराचा मुद्देमाल चोरीला

झुरखेडा येथे भरदिवसा बंद घरातून ४९ हजाराचा मुद्देमाल चोरीला


धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील झुरखेडा येथे अज्ञात चोरट्‌यांनी बंद घर फोडून घरातील रोकडसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घडना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, वामन तुळशीराम चौधरी (वय-४९) रा. झुरखेडा ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी त्यांनी घराचे दरवाजे बंद करून गेले होते. अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील ७ हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा एकुण ४९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी वामन चौधरी यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound