पाचोरा, प्रतिनिधी | येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सुनील नेत्रालय व शिवस्वराज्य युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान, तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप पाचोरा बसस्थानकात आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा जवळपास ४०० जणांनी लाभ घेतला.
आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. स्वप्नील पाटील यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच डॉ. सुनील पाटील यांनी शिबिरात आलेल्या गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून औषधोपचार करत मोफत औषधाचे वाटप केले. यावेळी शिबिरात डॉ.भरत पाटील, डॉ. जितेश पाटील यांची विशेष उपस्थिती होती. शिबिर यशस्वीतेसाठी गोपाल लोखंडे, सुधाकर पाटील, किशोर लोहार, अमोल कोळी, अमोल पाटील, किशोर देवकर, ऋषिकेश कोळी, शोयब खान, ममता तडवी, किरण सिस्टर व सुनील नेत्रालय हॉस्पिटलचे कर्मचारी व कपिल पाटील, पप्पू दाभाडे, गणेश पाटील, लखन वाघ, आसिफ शाह, दीपक जाधव यांनी कामकाज पहिले. सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सूनिल नेत्रालय व शिव स्वराज्य युवा फाउंडेशनने आयोजित केलेल्या ह्या भव्य अश्या आरोग्य शिबिरा बद्दल भावडू जाधव व शिव स्वराज्य युवा फाउंडेशन यांनी डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. सुनील पाटील यांचे आभार मानले. या शिबिराचा जवळपास चारशे रुग्णांनी लाभ घेतला.