Home क्राईम हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मोबाईल लांबविला

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मोबाईल लांबविला


जळगाव प्रतिनिधी । शहरातील हॉटेल स्टार पॅलेसमधून एका व्यक्तीच्या १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जयेश कैलास चौधरी (वय-२८) रा. नम्रता नगर, एरंडोल हा तरूण जळगाव शहरातील हॉटेल स्टार पॅलेस येथे नोकरीला आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.४० वाजेच्या दरम्यान जयेश चौधरी झोपलेला असतांना त्याच्या उशीजवळ त्याचा १० हजार रूपये किंमतीचा ठेवलेला मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची उघडकीला आले आहे. जयेशने हॉटेल परिसरात मोबाईलची शोधाशोध केली असता मोबाईल मिळाला नाही. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपापास पोलीस नाईका महेंद्र पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound