रावेर प्रतिनिधी | तुमच्याकडे गांजा असल्याने आम्हाला तपासणी करायची आहे असे सांगून दोन तोतया पोलिसांनी वृध्द शेतकर्याकडील १८ हजार रूपये लंपास करून पोबारा केल्याची घटना शहरात घडली आहे.
या संदर्भात वृत्त असे की, तालुक्यातील धुरखेडा येथील चिंधू तोताराम धनगर ( वय ६५ ) हा शेतकरी १८ हजार रुपयांत बैलाची विक्री करून ती रक्कम बँकेत ठेवण्यासाठी व दिवाळीनिमित्त सामान खरेदीसाठी मुलीसह रावेरला आला होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन तोतया पोलिसांनी चिंधू धनगर यांना गाठले. आणि तुम्ही गांजाची तस्करी करत असल्याची खबर आम्हाला मिळाली आहे . तुमची तपासणी करायची असल्याचे सांगून खिशात असलेले बैल विक्रीचे मिळालेले १८ हजार रुपये घेऊन त्या दोन्ही तोतया पोलिसांनी पोबारा केला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चिंधू धनगर यांनी रावेर पोलिसांत दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला . अशा या पूर्वीही शहर व तालुक्यात तोतया पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या तीन घटना घडल्या आहे . पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली तोतया पोलिसांचा शोध घेतला जात आहे.नागरिकांचे तपासाकडे लक्ष लागले आहे .