शेंदुर्णी, प्रतिनिधी | शेंदुर्णी व लोहारा येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय ग्राफलींग कुस्ती स्पर्धेत आ.र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा शेंदुर्णी येथील विद्यार्थी राजेंद्र रवींद्र भोई व लोहारा येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी केंद्रात विजय चौधरी दोघांना रौप्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेत ६ खेळाडू यांनी सहभाग घेतला होता. त्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, सचिव सतीश काशीद, ज्येष्ठ संचालक सागर जैन, सहसचिव दिपकराव गरुड, महिला संचालिका उज्वला काशीद, संस्थेचे वस्तीगृह सचिव कैलास देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर. पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे डॉ.महेश आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.