Home Cities जामनेर काँग्रेसच्या अल्पसंख्याक अध्यक्षपदी नबी शाह यांची नियुक्ती!

काँग्रेसच्या अल्पसंख्याक अध्यक्षपदी नबी शाह यांची नियुक्ती!


जामनेर, प्रतिनिधी| येथील शेंदुर्णी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नबी शाह यांनी भाजपला नुकतीच सोडचिठ्ठी दिल्यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत जामनेर तालुका काँग्रेसच्या अल्पसंख्याक अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यातील शेंदुर्णी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नबी शाह यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाशी फारकत घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या प्रदेश काँग्रेस कार्यालयात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप पवार यांनी नबी शाह याला काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी जामनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष एस. टी. पाटील उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी नबी शाह यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला होता. नबी शहा यांनी २५ वर्षे काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम केले आहे. यामुळे काँग्रेसला पक्षवाढीसाठी नक्कीच फायदा होणार आहे.


Protected Content

Play sound