शेंदूर्णी प्रतिनिधी | पहुर पोलिस स्टेशन हद्दीतील शेंदूर्णी व तोंडापुर येथे उद्या शुक्रवार (दि.१५) रोजी सकाळी ९ वाजता शेंदूर्णी तर सकाळी १० वाजता तोंडापुर पोलिस चौकी वास्तूंचे भूमिपूजन पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
४० हजार लोकसंख्या असलेल्या शेंदूर्णी गावी व १५ हजार लोकसंख्या असलेल्या तोंडापुर गावी पोलिस चौक्या असून त्यासाठी स्वतःची वास्तू नव्हती. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्थानिक नागरिकांची सभा घेऊन चर्चा केली व लोक सहभागातून दोन्ही गावी पोलिस चौकी वास्तू उभारण्यास नागरिकांनी सहमती दर्शवली. त्यानुसार लोकसहभागातून सदरच्या वास्तू उभारण्यात येणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनची स्थानिक नागरिकांची मागणी होती. उद्याच्या भूमिपूजन सोहळ्या नंतर लवकरच या दोन्ही ठिकाणी पोलिस चौकीच्या सुसज्ज वास्तू तयार झालेल्या दिसून येतील असे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सांगितले आहे.