Home Cities अमळनेर अमळनेरात बंद घर फोडून एलईडी टीव्ही लांबविला

अमळनेरात बंद घर फोडून एलईडी टीव्ही लांबविला

0
40

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील जीवन ज्योती कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरातील ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की मानसी राजेंद्र साळुंखे (वय-२५) रा. संस्कृती बंगला, जीवनज्योती कॉलनी अमळनेर या आपल्या कुटुंबियांसह राहतात. १० ऑक्‍टोबर रोजी ७.३० ते ११ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून एका नातेवाईकांकडे गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरातील ३५ हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. याप्रकरणी मानसी साळुंके यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.

 


Protected Content

Play sound