Home Cities जामनेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतर्फे महाराष्ट्र बंदमध्ये सहभागाचे आवाहन

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतर्फे महाराष्ट्र बंदमध्ये सहभागाचे आवाहन

0
33

जामनेर, प्रतिनिधी | जामनेरात उद्या सोमवार दि. ११ रोजी महाराष्ट्र  बंदसाठी  सहकार्य करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या  कार्यकर्त्यांतर्फे दुकानदारांना करण्यात आले.

 

राज्यात महा विकास आघाडीतर्फे बंद करण्यात येणार असून यासाठी जामनेर तालुका महाविकास आघाडी तर्फे व्यापारी व दुकानदारांना बंद ठेवण्यासाठी सायंकाळी आवाहन  करण्यात आले. यावेळी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष शरद त्र्यंबक पाटील, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष दीपक राजपूत, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, उपाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, शिवसेना भरत पवार, प्रहार संघटनेचे प्रदीप गायके आदी यावेळी उपस्थित होते. लखीमपुर खीरी हत्याकांड निषेधार्थ नागरिकांनी कडकडीत बंद ठेवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 


Protected Content

Play sound