एरंडोल प्रतिनिधी । शहरातील आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्या आजच्या वर्धापन दिनानिमत्त जीवन संवर्धन बेघर अनाथ आश्रमातील १०० मुलांना पोषक व गोडधोड जेवण देऊन साजरा करण्यात आला.
समाजातील बेघर व अनाथ मुलांना या माध्यमातून मायेची ऊब देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे अध्यक्ष जितेन्द्र पाटील यांनी सांगितले.आपल्याला प्रत्येकाला घरचे जेवण मिळण्याचे सौभाग्य लाभले आहे, परंतु समाजातील अशा बेघर आणि अनाथ मुलाच्या नशिबी मात्र हे भाग्य लाभत नाही, म्हणुनच संस्थेच्या या आनंददायी प्रसंगी मुलांना सहभागी करून घेण्यासाठी सदर वर्धापन दिनाचा कार्यक्रम जिवन संवर्धन संस्थेसोबत साजरा करण्याचा निर्णय संस्थाध्यक्ष व पदाधिकर्यांनी घेतल्याचे सांगणयात आले.
विविध आजारांवर मोफत उपचार करणे, गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देणे, अपंगांना मोफत कृत्रिम अवयव बसवून देणे, कोरोना काळात उद्योग आणि कामे बंद पडल्यामुळे गरजूंना लागणाऱ्या घरगुती वस्तूंचे वाटप करणे, रस्त्यावरील उपाशी लोकांना अन्नदान करणे, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष जितेन्द्र पाटील यांनी लावलेल्या लहानशा रोपट्याचे कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांच्या माध्यमातून हळुवारपणे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे मत उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. अधिक लोखंडे, डॉ. सुनिल महाजन, रवि कदम, अंबरनाथ येथील नगरस उमेश गुंजाळ, ठाणे माजी महापौर मुक्ता जाधव, संजय तरे, तनवी हुलवले, सचिन नाईक, आनंद तायडे, अभिजित राहपूर, विठ्ठल मोरे, शेजल मुरकर, राम मंडल, राजेश मुरकर, लता काळे, शुभम मुरकर, सुनील यांनी सहकार्य केले.