चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पाश्वभूमीवर तालुक्यातील लोणजे येथे भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांच्या प्रयत्नातून कोव्हीशिल्ड लसीचे ५०० डोस उपलब्ध झाल्याने शुक्रवार रोजी पाचशे जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली आहे. मात्र तिसरी लाट देशात केव्हाही येऊन धडकू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेला गावाच्या वेशीवरच थोपविण्यासाठी भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांच्या अथक परिश्रमातून तालुक्यातील लोणजे ग्रामपंचायतीला ५०० कोव्हीशिल्ड लसीचे डोस उपलब्ध झाले. त्याअनुषंगाने येथील जिल्हा परिषद शाळेत भव्य लसीकरण शिबिराचे शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी एकूण पाचशे जणांचे लसीकरण करण्यात आले. तत्पूर्वी गोरखनाथ बधू राठोड यांनी प्रथम लस टोचून घेतली. दरम्यान मोरसिंगभाई राठोड हे विविध सामाजिक उपक्रमांतून नेहमीच चर्चेत असतात. स्वतःजवळ कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना सामाजिक भावनेतून त्यांचे वाखाणण्याजोगा कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहेत.
दरम्यान या लसीकरणाप्रसंगी डॉ. व्ही. व्ही. पवार, आरोग्य सहाय्यक आर.जे.जोहरी, आरोग्य सेवक नितीन तिरमाळी, आरोग्य सेविका एल. एम.कदम, आरोग्य सेविका व्हि. आर. जाधव, आशा वर्कर के.ऐ.पवार, ऐ. यु. राठोड, पी.ए.पाटील, के.ए.कुंभार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच मोरसिंगभाई राठोड यांनी कोव्हीशिल्ड लस उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे.