‘त्या’ ट्रकचालकाचे अपहरण नव्हे तर खून !; एक अटकेत तर दोन फरार

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील ३५ वर्षीय तरूण ट्रकचालक बेपत्ता झालेले नसून दारू पिण्यावरून तिघांनी बेदम मारहाणीत ठार करून औरंगाबाद-वैजापूर घाटात मृतदेह फेकून दिल्याचा धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणात एकाला सावदा पोलीसांनी अटक केली आहे. इतर दोघा फरार आहे. सावदा पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की,  रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील रहिवासी याकूब गयासुद्दीन पटेल (वय-३५) हा त्याची मालवाहू ट्रक (एम एच १९ सीवाय ६८४३) घेऊन जात असताना १५ मे २०२१ सकाळी १० वाजता ऋषिकेश ऊर्फ माधव विठ्ठलराव शेजवळ (वय-२४)  रा.दावरवाडी ता.पैठण जि. औरंगाबाद, राजू ठेगडे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. पवन नगर नाशिक आणि संजय (पूर्ण नाव माहीत नाही) रा. औरंगाबाद यांनी संगनमताने करून याकूब पटेल यांचे अपहरण नाशिक एमआयडीसी परिसरात घेवून गेले. तेथे तिघांमध्ये दारू पिण्याच्या वादावरून तिघांनी याकुब यांना बेदम मारहाण केली होती. त्याच त्याचा मृत्यू झाला होता.

इकडे याकूब पटेल हे घरी आले नसल्याचे सावदा पोलीस ठाण्यात सुरूवातील मिसींग दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत व मोबाईल लोकेशनच्या माध्यामातून याकूब यांच्या संपर्कातील ऋषीकेश शेजवळ याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता , राजू ठेगडे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. पवन नगर नाशिक आणि संजय (पूर्ण नाव माहीत नाही) रा. औरंगाबाद इतर दोन साथीदारांची नावे सांगितले. सावदा पोलीसांनी ऋषीकेशला खाक्या दाखवताचा पोपटासारखा बोलून आम्ही तिघांना दारू पिण्याच्या वादातून बेदम मारहाण करून ठार केल्याची माहिती दिली. त्यानंतर तिघांनी संगनमताने मृतदेह औरंगाबदा वैजापूर घाटात फेकून दिल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार सावदा पोलीसांनी वैजापूर पोलीसांशी संपर्क साधला असता एकाची अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी तिन जणांवर याकूब पटेल यांचा खून केल्याप्रकरणी तिन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील इतर दोघेजण अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या ऋषीकेशला न्यायालयाने ८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. विभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, सुरेश आठवले, मोहसीन खान पठाण, विशाल खैरनार यांच्यासह सावदा पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

Protected Content