Home ट्रेंडींग मुंबई शेअर बाजार निर्देशांकाची मुसंडी

मुंबई शेअर बाजार निर्देशांकाची मुसंडी


bse

मुंबई (वृत्तसंस्था) जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने जोरदार मुसंडी मारली आहे. सेन्सेक्सने आज सकाळी १३४.४६ (०.३५%) अंकांच्या वाढीसह ३९,०४० अशी झेप घेतली आहे तर निफ्टीनेही ४५.८५ अंकांच्या वाढीसह ११,७३६ अशी उत्साहपूर्ण नोंद केली आहे.

 

आज सकाळी ९ वाजून १९ मिनिटांनी शेअर मार्केटच्या व्यवहारांना सुरुवात झाली. बाजार उघडताच निर्देशांकाने उसळी घेतली. यात आयसीआयसीआय बँक (२.५१ टक्के), कोल इंडिया (२.४४ टक्के), हीरो मोटोकॉप (१.६६ टक्के), वेदांता (१.५२ टक्के) आणि एशियन पेंट्स (१.४८ टक्के) या कंपन्या निर्देशांक वाढीच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकावर पाहायला मिळाल्या. तर निफ्टीत कोल इंडिया (२.५० टक्के), आयसीआयसी बँक (२.४६ टक्के), इंडियन ऑइल (२.४४ टक्के), हीरो मोटोकॉप (१.७५ टक्के) आणि एशियन पेंट्स (१.६५ टक्के) या कंपन्यांच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.

दरम्यान, सेन्सेक्समध्ये टाटा मोर्टस टीव्हीआर, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. तर निफ्टीत टाटा मोर्टर्स, इन्फोसिस, टाटा स्टील आणि हिंदुस्तान लीवरच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound