Home Cities जामनेर शेंदुर्णी येथील यश जैन लंडनला रवाना

शेंदुर्णी येथील यश जैन लंडनला रवाना

0
26

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील यश जैन हे बँकिंग प्रकल्पासाठी २४ सप्टेंबर २०२१ रोजी लंडनला रवाना झाले यश जैन हे शेंदुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते रसिकलाल जैन यांचे पुतणे तर दिलीप जैन यांचे चिरंजीव आहेत.

ते कॅपजेमिनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सिनियर कन्सल्टंट म्हणून नोकरी करतात. यश जैन हे आयटी इंजिनियर असून कंपनीतील सर्वात कमी वयातील ते इंजिनिअर आहेत. लंडन मधील मँचेस्टर येथील प्रकल्पासाठी कंपनीने त्यांची निवड केली आहे. आयटी क्षेत्रातील युवकांसाठी ते प्रेरणादायी ठरतील यात शंकाच नाही. लंडन येथिल प्रकल्पासाठी निवड झाल्याने या निवडीबद्दल माजी जि.प.सदस्य संजयदादा गरुड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, नगराध्यक्ष विजया खलसे, माजी जि.प.सदस्य सागरमल जैन, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर यांचेसह यांचेसह जैन परिवारातील सर्व जेष्ठ सदस्यांनी अभिनंदन केले.

 


Protected Content

Play sound