जामनेर प्रतिनिधी । जिल्हाभरात गुलाब चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होवुन शेतीसह घरांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी तसेच १०० टक्के पिकविमा द्यावा, अशी मागणी सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र सघंटनेच्या जामनेर तालुका शाखेच्यावतीने जामनेर तहसीलदार अरूण शेवाळे यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांचे कापुस, मका, केळी, सोयाबीन,ज्वारी, केळी,इत्यादी खरीपातील ऊभ्या पिकाचे नुकसान होवुन शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्याची नुकसान भरपाई म्हणून अतिवृष्टीमुळे नष्ट झालेल्या पिकांचे नुकसान म्हणून सरसकट मदत मिळावी, १०० टक्के पिकविमा मिळावा,ओला दुष्काळ जाहीर करावा, घरांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, तसेच अतिवृष्टीमुळे पाझर तलाव, के.टी.वेअर,बंदिस्त बंधारे, यांची झालेल्या हानीची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे अशा मागण्या सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र सघंटनेच्या जामनेर तालुका शाखेच्यावतीने जामनेर तहसीलदार अरूण शेवाळे यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.
यावेळी सघंटनेचे जिल्हा समन्वयक युवराज पाटील, तालुका समन्वयक श्रीकांत पाटील,व्हि.पी.पाटील सर, राजमल भागवत, अमोल पाटील, माधव महाजन, मनोरमा पवार,युवराज पाटील, सारंगधर अहिरे, बाळु चवरे,कलाबाई तंवर,रंजना राठोड, देवीदास नाईक, चांगदेव पाटील आदी उपस्थित होते.