Home Cities भुसावळ राष्ट्रवादीचे मातब्बर नेते विजय चौधरी समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

राष्ट्रवादीचे मातब्बर नेते विजय चौधरी समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

0
31

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय मोतीराम चौधरी यांनी आज समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विजय मोतीराम चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी भुसावळ नगरपालिकेत नगरसेवक, विविध सभापतीपदे, उपनगराध्यक्ष आणि प्रभारी नगराध्यक्ष आदी पदे भूषविलेली आहेत. ते संतोष चौधरी व अनिल चौधरी यांचे आतेभाऊ असून चौधरी बंधूंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ऐन लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी सुमारे ३०० कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे आदींच्या उपस्थितीमध्ये विजय मोतीराम चौधरी आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख ही तोंडावर आली असतांनाच विजय मोतीराम चौधरी यांच्यासारख्या मातब्बर पदाधिकार्‍याच्या भाजपमधील प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound