एसबीसीचे लोणावळामध्ये आरक्षण बचाव चिंतन शिबिर -शशिकांत आमने

सावदा,  प्रतिनिधी | सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ५० टक्केवरील आरक्षण हे बेकायदेशीर असल्याचा निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे एसबीसीचे दोन टक्के आरक्षण धोक्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील एसबीसी (विशेष मागास प्रवर्ग) च्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लोणावळा या १० तारखेला ठिकाणी चिंतन शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती एसबीसी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत आमने यांनी दिली आहे.

 

एसबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर गेली सात ते आठ वर्ष सातत्याने संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनेक आंदोलने,मोर्चे, निवेदने,उपोषणे या मार्गाचा अवलंब केलेला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार शासनस्तरावर मार्ग काढण्याचे आदेश २०१९ साली देण्यात आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर प्रशासनाशी सातत्याने बैठका घेण्यात आल्याआहेत. अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सद्यस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाने ५० टक्के वरील आरक्षण हे बेकायदेशीर ठरवले आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील एसबीसी या प्रवर्गावर कुऱ्हाड कोसळलेली आहे.या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी (विशेष मागास प्रवर्ग) एसबीसी चे लोणावळा येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी विशेष मागास प्रवर्ग मधील सर्व समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एसबीसी संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत आमणे यांनी केले आहे.

 

Protected Content