Home राजकीय राज ठाकरेंचा दणका ; हरिसाल’मधले प्रश्न सोडवण्याचे आश्वासन : विनोद तावडे

राज ठाकरेंचा दणका ; हरिसाल’मधले प्रश्न सोडवण्याचे आश्वासन : विनोद तावडे


vinod tawade raj
 

मुंबई (वृत्तसंस्था) भारतातले पहिले ‘डिजिटल गाव’ अशी ओळख मिळालेल्या हरिसाल या गावातील वास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेत जगासमोर उघड केले. राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकारला जाग आली असून या गावातले जे काही तांत्रिक प्रश्न असतील ते सोडवले जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

 

अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे ‘डिजीटल व्हिलेज’ असल्याची जाहिरात सरकारकडून करण्यात आली होती. राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात या जाहिरातीबद्दलचा एक व्हिडीओ समोर आणला होता. सरकारकडून या गावाबद्दल जाहिरातीत करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांनी सरकारचे दावे खोटे ठरवल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेंचा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी सोलापुरात झालेल्या सभेत ‘डिजिटल व्हिलेज हरिसाल’च्या जाहिरातीत काम केलेल्या हरिसाल गावच्या मनोहर खडके या तरुणालाच मंचावर बोलावत सरकारचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड केला. त्यामुळे अखेर सरकारला राज ठाकरेंच्या म्हणण्याकडे लक्ष द्यावे लागले आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याप्रकरणी लक्ष घालून हरिसालमधील तांत्रिक प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound