दहिगाव परीसरात जंतनाशक गोळ्यांचे वाटप

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र दहिगाव येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान राबवण्यात आली. १ ते १९ वर्षाच्या मुला-मुलींना अंगणवाडी, शाळा व गावात घरी जाऊन जंतनाशक गोळयांचे वाटप करण्यात आले.

राज्यातील कृमी दोषाचे रुग्ण शून्यावर आणण्यासाठी व्यापक नियोजन करून आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात व तालुक्यात दिनांक २१ ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात आली. दहिगाव येथे आरोग्य सेवक राजेंद्र बारी यांनी १ ते ६ वर्षापर्यंतच्या बालकांना अंगणवाडीत, तर ८ वी ते १० वीच्या मुला-मुलींना शाळेत, व १ ली ते ७ वी चे वर्ग सुरू नसल्याने या विद्यार्थ्यांना आणि शाळाबाह्य मुला-मुलींना आशा सेविकांच्या माध्यमातुन घरी जाऊन जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी व आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सदर कार्यक्रमास सरपंच अजय अडकमोल, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख, मुख्याध्यापक शालीक चौधरी, व विद्यालयाच्या शिक्षीका तथा आदीवासी एकात्मीक प्रकल्प स्तरिय समितीच्या माजी अध्यक्ष मिना राजु तडवीशिक्षक वृंद, अनिता नेहते आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content