Home Cities एरंडोल भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा व समर्पण अभियानांतर्गत सामाजिक उपक्रम

भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा व समर्पण अभियानांतर्गत सामाजिक उपक्रम

0
37

एरंडोल, प्रतिनिधी |  तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवार  दि. २९ सप्टेंबर  रोजी  व्यापारी आघाडी  जिल्हाउपाध्यक्ष अशोक  चौधरी यांच्या स्वस्त धान्य दु.क्र.८  बुधवार दरवाजा येथे सेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आघाडीतर्फे गरीब कुटुंबांना धान्य किट वाटप व किसान- सन्मान योजना अंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

 

एरंडोल तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्य जनजाती क्षेत्र प्रमुख  ॲड.किशोर काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान राबविण्यात आले. यावेळी अभियान प्रमुख रमेश परदेशी लोकनियुक्त नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन , व्यापारी आघाडी जिल्हाउपाध्यक्ष  अशोक चौधरी , तालुका सरचिटणीस अमोल जाधव , डॉ.नरेंद्र पाटील, ॲड.नितीन महाजन नगरसेवक,नगरसेविका जयश्री पाटील , उप जिल्हा अध्यक्ष महिला भाजपा आरती परदेशी, शोभा पाटील, मीना चौधरी, तृप्ती बिर्ला, रत्ना देवरे, संध्या महाजन, शोभना साळी, पुष्पा येवले, नयना पाटील, नीता महाजन, अंजुषा विसपुते, निशा विंचूरकर, सौ. चौधरीताई , तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाजन , अजेंद्र पाटील, वाल्मिक सोनवणे, संजय साळी, सुभाष पाटील, ऋषिकेश पाटील, नरेश ठाकरे, नंदलाल सोनार, धनराज पाटील, लोकेश महाले, प्रदीप पाटील सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी, जि.प.सदस्य, प.स सभापती, सदस्य, नगरसेवक, सर्व आघाड्या, मोर्चे यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, व सर्व तालुकाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound