जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात व्यक्तीने हिसकावून पसार झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी उघडकीला आली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र कुमार तनसुख संघवी (वय-६५) रा. संघवी गृहउद्योग पापड फॅक्टरी पाळधी ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. २० सप्टेंबर रोजी १२.३० वाजेच्या सुमारास देवेंद्र संघवी यांची आई चंदाबाई संघवी या राहत्या घराच्या वडील मोकळ्या जागेत असताना अज्ञात २५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी देवेंद्र संगवी यांच्या फिर्यादीवरून पारधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण निकुंभ करीत आहे.