Home धर्म-समाज नांद्रा येथे संततधार पावसामुळे घर कोसळले : सुदैवाने जीवितहानी नाही

नांद्रा येथे संततधार पावसामुळे घर कोसळले : सुदैवाने जीवितहानी नाही

0
36


पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा व परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाची सततधार सुरु आहे. यात काल बुधवारी नांद्रा येथील बोरसे गल्लीतील एकाचे मातीचे  घर पावसाचे पाणी मुरल्याने कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

गेल्या दोन दिवसांपासून सततधार पाऊस चालूच आहे व काल दि. २२ सप्टेंबर पासून मध्य राञी पासून पाऊसाचा जोर खूपच वाढला व याच संततधार पाऊसामुळे बोरसे गल्लीतील भास्कर ञ्यबंक बाविस्कर यांच्या मालकीचे असलेले मातीचे घर पावसाचे पाणी मुरून कोसळले. सुदैवाने त्यात कोणी राहत नव्हते म्हणून जिवीतहाणी टळली आहे. परंतु, घरामधील जीवनाश्यक वस्तू, भांडे, पाण्याची टाकी, अन्न धान्य, शेतीचे अवजारे व इतर संसारोपयोगी वस्तू दबल्याने मोठे प्रमाणात नूकसान झाले असून पडलेल्या घराचा पंचनामा होऊन उचित भरपाई मिळण्याची मागणी गुलाब भास्कर बाविस्कर यांनी केली आहे. गेल्या दोन दिवासांपासून नांद्रा परिसरात अतिवृष्टी होत असून माणसाबरोबरच गुरे ढोर यांची ही संततधार पाऊसामुळे यातायात होत आहे व गुराढोरांवर ही साथीचे आजार येत आहे. शेतीचे येणारे उत्पन्न ही आता हिरावले गेले आहे. कापूस पिवळा पडत आहे, कैऱ्या सडत आहेत, सोयाबीन आडवा पडून शेंगा सडत आहेत, मक्का, ज्वारी व इतर पिके नेस्तनाबूत होऊन सडत आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे ६० एम. एम. च्या वर पावसाची नोंद झाली तर अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते. तरी पर्जन्यमान मापनयंञाचे अहवाल घेऊन सरसकट ओला दृष्काळ जाहीर करावा अशी मागणी नांद्रा सह  परिसरातील शेतकरी वर्गातून व पशुपालक व ग्रामस्थ यांच्यातून होत आहे.

 

 


Protected Content

Play sound