यावलमध्ये प्रतिभाताई शिंदे यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाची आढावा बैठक

यावल,  प्रतिनिधी ।  येथे उद्या बुधवार २२ सप्टेंबर रोजी समाजसेवक तथा लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्ष  प्रतिभाती  शिंदे यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील ओबीसी बंधू-भगिनींनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ओबीसी समाजाच्या समस्या आणि समाजावर होणाऱ्या अन्याय लक्षात घेता उद्या यावल येथे तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांसाठी ओबीसी हक्क परिषदच्या माध्यमातून  दिनांक २२ सप्टेंबर बुधवार रोजी आढावा बैठक आयोजीत करण्यात आली आहे. जळगाव येथे दिनांक २५ रोजी ओबीसी हक्क परिषदची आढावा बैठक समाजसेवक तथा लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ आहे. तत्पुर्वी या विषयाच्या पार्श्वभुमीवर दिनांक २२ सप्टेंबर बुधवार रोजी यावल येथे दुपारी २.३० वाजता यावल येथील शेतकी संघाच्या सभागृहात आढावा परिषद पुर्वी नियोजन बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीला  यावल तालुक्यातील सर्व ओबीसी जातीच्या समाज बांधवांनी व भगीनी यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी हक्क परिषदच्या वतीने करण्यात आले आहे .

Protected Content