Home क्राईम जळगावात विवाहितेचा विनयभंग; आठ जणांवर गुन्हा दाखल

जळगावात विवाहितेचा विनयभंग; आठ जणांवर गुन्हा दाखल

0
56
90908765 stock vector black and white illustration of a hand covering woman mouth concept for abuse or domestic violence
90908765 stock vector black and white illustration of a hand covering woman mouth concept for abuse or domestic violence

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारे विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारे (वय-२२) विवाहित आपल्या कुटुंबीयांसह राहते. 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील रामनगर येथील रहिवासी दया खामकर, बाजीराव खामकर, खंडू देसले, वंदना खामकर, सोनी बाजीराव खामकर, त्रिशा, वैशाली (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी विवाहिता दांडिया खेळत असताना धक्का लागल्याने वरील आठ जणांनी शिवीगाळ करून मारहाण करत विनयभंग केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फारूक तडवी करीत आहे.

 


Protected Content

Play sound