अमळनेर (प्रतिनिधी) : सध्या ईडी आणि सीडीची चर्चा सुरू असली तरी याच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या पेट्रोल पंपाचे भूमिपुजन आणि माती परीक्षण यंत्राचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. कुणी काहीही म्हटले तरी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा आशावाद व्यक्त करतांनाच ना. गुलाबराव पाटील यांनी बाजार समितीच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक केले.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या पेट्रोल पंपाचे आणि माती परिक्षण केंद्राचे भूमिपुजन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, संभाजी पाटील, विजय पाटील, एल.टी. पाटील, सुरेश पाटील,जितेंद्र राजपूत, बी.के. सूर्यवंशी, भाईदास अहिरे, सार्वजनीक बांधकाम खात्याचे आर.टी. पाटील, इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी अश्वीन यादव, शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील, सरपंच भरत बिरारी, केदार पवार यांच्यासह शाखा या अभियंता प्रफुल्ल पाटील, सहाय्यक निबंधक के. पी. पाटील, यांच्यासह संभाजी पाटील , नाना पाटील, प्रा. सुरेश पाटील , जितेंद्र राजपूत, बी. के. सूर्यवंशी व भाईदास आहिरे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पेट्रोल पंप भूमिपूजन व माती परीक्षण यंत्र शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आले. याप्रसंगी एपी कन्सल्टंटचे संचालक अजय पाटील यांनी माती परिक्षण यंत्राचे पालकमंत्र्यांसह इतर मान्यवरांसमोर प्रात्यक्षिक दाखविले.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की,सत्ता हे जनहितासाठी चे साधन असून त्यातून जनहित साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नेत्यांची श्रीमंती ही कार्यकर्त्यावर अवलंबून असते कार्यकर्ता संपला तर नेता संपायला वेळ लागत नाही तसेच काही कार्यकर्त्यांची निष्ठा तपासणी देखील तेवढेच गरजेचे असते. राजकारणात एक विचार असाय लावा असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. राज्यात पाच वर्ष महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर अमळनेर तालुक्यात देखील महाआघाडी भक्कम ठेवा असे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार अनिल दादा पाटील यांना उद्देशून म्हणाले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पाडळसरे धरणासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोविड काळ सुरू असला तरी यासाठी १३२ कोटी रूपयांचा प्राप्त झालेला आहे. दिवाळीपर्यंत कोरोनाची आपत्ती संपल्यानंतर अजून निधी आणून या प्रकल्पाचे काम मार्गी लावता येईल. हा प्रकल्प फक्त अमळनेरच नव्हे तर पाच तालुक्यांना वरदान ठरणारा असून यासाठी आपण आमदार अनिलदादा पाटील यांच्यासोबत सतत प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य प्रशासक सौ. तिलोत्तमाताई पाटील, यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. तर, आभार सहसचिव बाळासाहेब शिसोदे यांनी मानले.