Home आरोग्य पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त १० हजारांपेक्षा जास्त लसीकरणाचे लक्ष (व्हिडिओ)

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त १० हजारांपेक्षा जास्त लसीकरणाचे लक्ष (व्हिडिओ)

0
31

जळगाव, प्रतिनिधी  । सेवा व समर्पण अभियानांर्गत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष व जी.एम. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  १० हजारपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण अभियानांर्गत  विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार आज खान्देश सेन्ट्रल मॉल येथे  एकाच छताखाली १० हजारांपेक्षा जास्त नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था  करण्यात आली आहे. यात नागरिकांचे नाव नोंदणीसाठी व लस घेण्यासाठी स्वतंत्र रांग लावण्यात आली होती. या लसीकरण महाकुंभास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  याप्रसंगी  जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष उज्वला बेडाळे स्थायी समिती सभापती  राजेंद्र घुगे पाटील,  गट नेते भगत बालाणी, महिला आघाडी  जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे आदींची उपस्थित होती.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/440523547368969

 


Protected Content

Play sound