Home धर्म-समाज मेळसांगावे व पंचाने येथील युवकांचा भाजपात प्रवेश

मेळसांगावे व पंचाने येथील युवकांचा भाजपात प्रवेश

0
54

मुक्ताईनगर प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते आज मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगावे, पंचाने येथील युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

तसेच भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये कार्यरत होऊन पक्षाचे विचार तळागाळात पोहचविणे तसेच माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याबाबत विचार व्यक्त केले. यावेळी भाजयुमो कार्यकारिणीच्या तालुका सरचिटणीस पदी हर्षद (मयुर) कृष्णा महाजन व उमेश रमेश भिंगरे, भाजयुमोच्या तालुका सोशल मीडिया संयोजकपदी कल्पेश रामदास पाटिल व भाजयुमोच्या तालुका कोशाध्यक्ष पदी आकाश संतोष ठाकरे यांची नियुक्ती पत्र देऊन नव्याने निवड करण्यात आली.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, हर्षद (मयुर) कृष्णा महाजन, उमेश भिंगरे, कल्पेश पाटिल, आकाश ठाकरे, संजय ठाकरे, बबलू पाटील, योगेश तायडे, जितेंद्र ठाकरे, कुंदन ठाकरे, मयुर ठाकरे, पवन ठाकरे, आकाश ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, कुणाल तायडे, यशराज पाटील, सुरज पाटील, पवन पाटील, प्रतिक कोळी, गजानन पाटील, पवन ठाकूर, अमोल ठाकरे ई. उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound