Home Cities जळगाव तांबापुरा येथे बिस्मिल्ला चौकात घरासमोर तरूणाला मारहाण

तांबापुरा येथे बिस्मिल्ला चौकात घरासमोर तरूणाला मारहाण

0
24

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा परिसरातील बिस्मिल्ला चौकात घरासमोर उभ्या तरूणाला एकाने काहीही कारण नसताना काठीने मारहाण केल्याची घटना गुरुवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ४.३० वाजता घडली. याप्रकरणी गल्लीतील मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात  एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तांबापुरा परिसरात  बिस्मिल्ला चौकात शेख सादिक शेख सलीम (वय-३४) हे वास्तव्यास आहेत.  मिस्तरी काम करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवतात. गुरुवारी सकाळी ते त्यांच्या घरासमोर उभे  असताना  टिपू ऊर्फ भैय्या शेख सलीम  रा. बिस्मिल्ला चौक  याने काहीही कारण नसताना शेख सादिक यांना काठीने हातावर तसेच पाठीवर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी शेख सादिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound