कामागारांच्या विविध मागण्यांसाठी सह. आयुक्त कार्यालयासमोर उपोषण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । समाज कल्याण विभागांतर्गत सामाजिक न्याय भवनातील अस्थापनेतील सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचारी यांचे थकीत वेतन यासह विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक कामगार समितीच्या वतीने जळगाव येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाज कल्याण विभाग अंतर्गत सामाजिक न्याय भवनात सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचारी यांचे डिसेंबर २०२ पासूनची वेतन दिले नाही, याबाबत आस्थापनेचे संबंधित अधिकारी व एजन्सीचे संबंधित अधिकारी यांच्याकडे सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी व संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दरम्यान डिसेंबर २०२० पासून वेतन देण्यात यावे, कामगारांकडून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्यात यावी, कामगारांना इएसआयसी दवाखान्याची सुविधा उपलब्ध व्हावी, कामगारांना दिवाळी बोनस  तसेच ओळखपत्र दिले जावे, कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायद्यांतर्गत सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी, अश्या विविध मागणींसाठी आज गुरूवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता  सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक कामगार समितीच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.  हे उपोषण  संघटनेचे सचिव बापूसाहेब जावळे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.

 

Protected Content