पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न; चार मद्यधुंद शिक्षकांना अटक

4poice theft

जळगाव (प्रतिनिधी) शहरात निवडणूक प्रशिक्षणासाठी निवडणूक कर्मचारी म्हणून आलेल्या चार मद्यधुंद शिक्षकांनी शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता वाहतूक पोलिस पोलिसांच्या अंगावर कार घालत हुज्जत घातली होती. याप्रकरणी रामानंद पोलिस ठाण्यात विपीन वसंतराव पाटील (रा.भडगाव), विजय पाटील, नितीन भालेराव व पंकज बाविस्कर या चार शिक्षकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

 

 

या संदर्भात अधिक असे की, शहरात निवडणूक प्रशिक्षणासाठी निवडणूक कर्मचारी म्हणून विपीन वसंतराव पाटील (रा.भडगाव), विजय पाटील, नितीन भालेराव व पंकज बाविस्कर हे आले होते. हे शिक्षक चारचाकीने (एमएच १५ डीसी २९३१) भुसावळकडून जळगाव शहराकडे येत होते. इच्छादेवी चौफुलीवर वाहतुकीची कोंडी झाली होती. तेथे वाहतूक पोलिसाने तपासणी करण्यासाठी त्यांची चारचाकी थांबवण्याचा इशारा केला. पंरतू, शिक्षकांनी थेट वाहतूक पोलीस विशाल जोशी व सवींद्र मोरे यांच्या अंगावर कार नेऊन हुज्जत घातली. यानंतर जोशी यांची कॉलर पकडून धमकी दिली. यानंतर पोलिसांना धमकावले. ‘तुम्ही आम्हाला ओळखले नाही का?, आत्ता तुम्हाला सस्पेंड करुन टाकू’ अशा भाषेत त्यांनी पोलिसांना धमकी दिली होती. यानंतर अतिरीक्त पोलिस बंदोबस्त मागवून शिक्षकांना रामानंदनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चौघांना अटक करुन रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती चौघांना न्यायालयीन कोठडी देऊन कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content