Home क्राईम सांगवी येथील शेतकऱ्याच्या दोन बैलांची चोरी

सांगवी येथील शेतकऱ्याच्या दोन बैलांची चोरी

0
34

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी येथील एका शेतकऱ्याचे ४५ हजार रुपये किमतीचे बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी बुधवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सतीश संतोष कोळी (वय-३६) रा. सांगली खुर्द ता. यावल हे शेती काम करतात. त्यांच्याकडे ४५ हजार रुपये किंमतीचे दोन बैल आहेत. बैलाच्या मदतीने ते शेती करतात. १३ सप्टेंबर रोजी रात्री १० ते १४ सप्टेंबर सकाळी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या मागे असलेल्या गोठ्यातून दोन्ही बैल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मंगळवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या  सुमारास यावल पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक जवरे करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound