Home Cities अमळनेर रावेर नगराध्यक्ष अन अमळनेरचे आमदार यांच्यातील चर्चेबाबत उत्सुकता

रावेर नगराध्यक्ष अन अमळनेरचे आमदार यांच्यातील चर्चेबाबत उत्सुकता


0b9b9717 54d2 45a5 ab61 c0567b6056a9

रावेर (प्रतिनिधी) रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद व अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्यात रविवारी तब्बत एक तास विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी उभय नेत्यांमध्ये राजकीय परीस्थितीवरही चर्चा झाली. या चर्चेमध्ये नेमका कोणता विषय होता, हे कळले नसले तरी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या खळबळजनक घडामोडींमुळे या भेटीकडेही लोक वेगळ्या अर्थाने बघत आहेत.

रावेरचे नगरसेवक अॅड. सुरज चौधरी यांच्या घरी आमदार शिरीष चौधरी यांनी रविवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रावेर नगरपालिकेला कायमचा सीईओ मिळावा आणि हद्दवाढ होण्यासाठी नगराध्यक्ष यांना मदत केल्याची आठवण यावेळी करून दिली. आंचारसंहिता संपताच रावेर नगरपालिका हद्दी बाहेरील वसाहतीला कोट्यवधी रुपयांचा निधी देणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी रावेरचे नगर सेवक सुधीर पाटील सादीक मेंबर युवा शक्तिचे सचिव पंकज महाजन आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound