Home Cities भुसावळ वरणगाव, दीपनगर येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण

वरणगाव, दीपनगर येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण


varangaon

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव आणि दीपनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पाल्यार्पण करण्यात आले.

 

यावेळी भाजप, शिवसेना, आरपीआय(आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना या महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पंस सभापती प्रिती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, पंस सदस्य मनीषा पाटील, कृउबा समिती संचालक प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष अरुणाताई इंगळे, नगरसेविका रोहिणी जावळे, नगरसेविका जागृती बढे, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, अतुल झांबरे, गुड्डू बढे, हाजी मका सेठ, स्वप्नील पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस महेश सोनावणे, कौस्तुभ महाजन, वैभव महाजन, लल्ला माळी, रमेश इंगळे, महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

वंचित बहूजन कंत्राटदार संघटना

Dipnagar

दीपनगर विद्युत केंद्रातील वंचित बहूजन कंत्राटदार संघटनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष मुबारक खान पठाण यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांती सुर्य महात्मा ज्याेतीबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यापर्ण करून अभिवादन केले. उपाध्यक्ष मन्साराम कोळी, शाखाध्यक्ष नारायण झटके यांनी मनोगत व्यक्त केले.प्रदेश सचिव प्रकाश सरदार यांनी सुत्रसंचालन केले. संघटक प्रकाश तायडे, दिनकर सुर्यवंशी, प्रेमसिंग ठाकूर, रवी सरदार आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound