धुमस्टाईल मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । पांडे चौक आणि रिंग रोड परिसरात पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातून मोबाईल हिसकावून मोबाईल लांबविणाऱ्या तिघांपैकी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केला असून दोघांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अक्षय मुकेश अटवाल आणि अक्षय आनंदा जावळे दोन्ही रा. शनीपेठ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा पेठ पोलीसात दाखल असलेले मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्यात. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार विजय पाटील, युनूस शेख, पोहेकॉ जयंत चौधरी, संदीप साळवे, पो.ना. विजय पाटील, पो.ना. किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, पंकज शिंदे, मुरलीधर बारी यांनी शनीपेठ हद्दीत जावून संशयित आरोपी अक्षय मुकेश अटवाल आणि अक्षय आनंदा जावळे दोन्ही रा. शनीपेठ यांना दोघांना राहत्या घरातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहे. त्यांची चौकशी केली असता दोघांसह त्यांचा मित्र राहित उर्फ रोहन पंडीत निदाने रा. शनिपेठ यांनी मिळून एक मोबाईल पांडे चौकातून तर दुसरा रिंग रोडवरून पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातून हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली. दोघांना पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Protected Content