भाजपा बोदवडतर्फे १३ जणांना कारणे दाखवा नोटीस

बोदवड प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी बोदवड तालुक्याने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. महापौर, नगरसेवक, ४ पं.स सदस्य, व १ जी.प सदस्यांसह १३ जणांना पक्षाचा कार्यक्रम सोडून इतर पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित दिलेल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, आपण भारतीय जनता पार्टीचे चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात आणि आपण जाणून आहात मागील ६ महिन्यापासून आजतागत म्हणजेच मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहराच्या वतीने प्रदेशावरून आलेले अनेक समाजभिमुक व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबविन्यात आले. त्यात आपण यापैकी एकाही कार्यक्रमास जाहीर आव्हानानंतरही उपस्थितीत राहू शकला नाही. जे की पक्षचिन्हावर निवडणूक लढवून लोक- नियुक्त होऊन आपण उपस्थिती लावणे हे पक्ष बांधणीसाठी आपले दायित्व ठरत होते. या खेरीज अन्य पक्षाच्या कार्यक्रमात आपण वा आपले पती /मुल /जवळची नातलग अतिशय शिथापीने काम करतांना आढळली तरी! आपल्या या अशा संभ्रमात टाकणाऱ्या कृती मुळे कार्यकर्त्यां मध्ये आपल्या सारख्या जबाबदार लोकनियुक्त व्यक्तीबद्दल नाना प्रकारचे कयास लावले जात आहेत. तरी आपण जाणून आहोत की आपल्या पक्षसंघटन अनुशासनाचा एक भाग म्हणून आपण आपल्या अनुपस्थितीचे व अन्य पक्षातील आपल्या उपस्थितीचे योग्य ते कारण विषद केले पाहिजे तरी प्रदेश कार्यालय व जिल्हा कार्यालयवरुन आलेले पक्षादेश पाळून आपण लवकरात लवकर आपले लेखी उत्तर ७ दिवसांच्या आत आपले जिल्हाध्यक्ष किंवा मंडळ अध्यक्ष यांना कळवाल, ही अपेक्षा  ७ दिवसांच्या आत लेखी कारण न दिल्यास कार्यवाही करण्याचे संकेत दिल्यामुळे आता लोकप्रितिनिधी कार्यवाही टाळण्यासाठी काय कारण देतात याकड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Protected Content