गोद्री येथील विठ्ठल मंदीराची दानपेटी फोडली

पहूर ता. जामनेर । येथून जवळ आलेल्या गोद्री येथील विठ्ठल मंदीरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील ३५ हजाराची अंदाजित रक्कम चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गोद्री गावात विठ्ठलाचे मंदीर आहे. या मंदीरात भाविकांसाठी दानपेटी ठेवण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी  रात्री १० ते ६ सप्टेंबर रेाजी सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी विठ्ठल मंदीरातील दानपेटी फोडून पेटीतील ३५ हजाराची चिल्लर व रोकड लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे करीत आहे. 

 

Protected Content